स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनी ॥
विघ्नांच्या उठिल्या फौजा । भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली, चिर्डिली रागे । आनंदवनभूवनी ॥
खौळले लोक देवांचे । मुख्य देवचि उठिला ।
कळेना काय रे होते । आनंदवनभूवनी ॥
बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले ।
अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभूवनी ॥
त्रैलोक्य गांजिले मागे । विवेकी ठाउके जना ।
कैपक्ष घेतला रामे । आनंदवनभूवनी ॥
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडिली मांडिली क्षेत्रे । आनंदवनभूवनी ॥
उदंड जाहले पाणी । स्नान संध्या करावया ।
जप-तप-अनुष्ठाने । आनंदवनभूवनी ॥
रामवरदायिनी माता । गर्द घेउनी ऊठिली ।
मर्दिले पूर्वीचे पापी । आनंदवनभूवनी ॥
भक्तांसि रक्षिले मागे । आताहि रक्षिते पहा ।
भक्तांसि दीधले सर्व । आनंद
||जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:
Post a Comment