Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Thursday, May 17, 2012

समर्थ रामदासांचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र :





 
निश्र्चयाचा महामेरू । बहुतजनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। १ ।।

परोपकाचीया राशी । उदंड घडती जयाशी ।
जायचे गुणमहात्त्वाशी । तुलना कैशी ।। २ ।।

नरपती हयपती गजपती। गडपती भूपती जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी ।। ३ ।।

यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नितीवंत । जाणता राजा ।। ४ ।।

आचरशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील। सर्वा ठायी ।। ५ ।।

धीर उदार सुंदर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले।। ६ ।।

तीर्थ क्षेत्रे वत मोडिली । ब्रम्हस्थाने बिघडली ।
सकल पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।। ७ ।।

देवधर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।। ८ ।।

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याद्निक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायी ।। ९ ।।

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ।। १० ।।

आणखी काही धर्म चालती । श्रीमंत होऊनि कित्येक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विस्तारली ।। ११ ।।

कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला । शिवकल्याण राजा ।। १२ ।।



श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात





श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात
सद्गुरुविण ज्ञान कांहीं| सर्वथा होणार नाहीं | अज्ञान प्राणी प्रवाहीं| वाहातचि गेले |
ज्ञानविरहित जें जें केलें| तें तें जन्मासि मूळ जालें | म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें| सुधृढ धरावीं |




||श्रीराम समर्थ || जय जय रघुवीर समर्थ ||



||श्रीराम समर्थ || जय जय रघुवीर समर्थ ||



नाहीं उपासनेचा आधार.



नाहीं उपासनेचा आधार| तो परमार्थ निराधार |कर्मेंविण अनाचार| भ्रष्ट होती

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन| स्वधर्मकर्म आणि साधन |कथा निरूपण श्रवण मनन| नीति न्याये मर्यादा |

यामधें येक उणें असे| तेणें तें विलक्षण दिसे |म्हणौन सर्वहि विलसे| सद्गुरुपासीं |

तो बहुतांचें पाळणकर्ता| त्यास बहुतांची असे चिंता |नाना साधनें समर्था| सद्गुरुपासीं.



 

श्रवण मननाचा विचार ..



  • श्रवण मननाचा विचार | निजध्यासे साक्षात्कार | रोकडा मोक्षाचा उधार | बोलोची नये ||१७-३-३ ||
जे श्रवण केले ते मनन करून विचार वाढवावा .त्यानंतर जे मिळवायचे आहे [माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय परब्रह्माची प्राप्ती ] त्याचा निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा .ह्याची देही ह्याची डोळा ,ह्याची जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यावी .आत्मसाक्षात्काराने रोकडी प्रचीती घ्यावी असे समर्थ सांगतात .पुढील जन्मात मोक्षप्राप्ती करून घेउ अशी उधाराची भाषा बोलू नये असे समर्थांचे सांगणे आहे ,कारण पुढचा जन्म कोणता मिळेल ते सांगता येत नाही
 
 
 

देव जवळी जवळी अंतरी ...



देव जवळी जवळी अंतरी |
परी भेट नाही जन्मवरी |
तयास पहात वरीवरी |
कळेल कैचा |
कळाया शोधावे अंतर |
तव तो नित्यनीरंतर |
तयास पाहता विकार |
निर्विकार होती |

येथे कर्माचा प्रसंग |

येथे कर्माचा प्रसंग |
कर्म केले पाहीजेत सांग |
कदाचीत पडले व्यंग |
तरी प्रत्यवाय घडे |

कर्म केलेची करावे |
ध्यान धरीलेची धरावे |
विवरलेची विवरावे |
पुन्हा निरुपणी |
 
 

आम्ही तेने सुखी |

 
आम्ही तेने सुखी |
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी |
तुमचे येर वित्तधन |
ते मज मृत्तीकेसमान |
कंठी मिरवा तुळशी |
व्रत करा एकादशी |
न करावे सायास |
तुका म्हणे हाची हेत |
 

अनुदीन अनुतापे तापलो रामराया |



अनुदीन अनुतापे तापलो रामराया |
परमदीनदयाळा निरशी मोहमाया |
अचपळ मन माझे नावरे आवरीता |
तुजवीण शिन होतो धावरे धाव आता |
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला |
स्वजनजनधराचा व्यर्थम्या स्वार्थ केला |