Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 19, 2012

तुकोबा - शिवराय भेट.


 महाराष्ट्राच्या या दोन परमोच्च विभूतींची भेट हा एक सूर्यचंद्र, गंगायमुना, मेरुमंदार, यांच्या मीलनाचा, श्रेष्ठ तत्त्वांचा संगम होता. आमच्या दृष्टीने यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शिवाजी व तुकोबा यांच्या भेटीचा काल साधारणत: शके 1565 ते 1570-71 एवढाच असू शकेल. रामदास, शिवाजी व तुकोबा यांच्या संबंधाबद्दल सर्वसामान्य वाचक जेव्हा विचार करू लागतो तेव्हा हे तिघेही एकमेकांच्या संपूर्ण हयातीत जिवंतच होते असे गृहीत धरलेले असते. तीत एक स्पष्ट कल्पना ध्यानी घेणे अवश्य आहे. ती म्हणजे शिवरायाचा जन्म सन 1630 चा निश्चित असेल तर तुकोबांचे निर्याणप्रसंगी ते फक्त एकोणीस वर्षाचे होते. तेव्हा तुकोबांची व शिवरायाची भेट, वह्या तरल्यानंतर जी तुकोबांची प्रसिध्दी झाली त्या सुमारास व शिवराय स्वराज्याकरिता चळवळ करू लागले त्या त्यांच्या वयाच्या 15 व्या वर्षानंतर झाली आहे. शिवराय हे स्वराज्यासाठी जशी मावळयांची प्रत्यक्ष मदत घेत होते, त्याचप्रमाणे ते हिंदवी राज्यासाठी साधुसंतांचा आशीर्वाद मिळवीत होते. त्यांनी या कामी मुसलमान साधूकडूनही जर शुभकामना अपेक्षिल्या व त्यांच्या परामर्ष घेतला तर हिंदुधर्मातले त्याकाळचे निरपेक्ष सर्वश्रेष्ठ साधुवर्य यांनाच तेवढे न भेटता, वगळले असेल हे शक्यच नाही. शिवराय व तुकोबा यांच्या भेटीबद्दलची तुकोबारायांची प्रत्यक्ष अक्षरे आता पाहा. ते गातात-

‘दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥

आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥

मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥

गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥

सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती॥

तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥’

या प्रसंगातील दोन्ही पुरुषांचे वर्तन त्यांचे जीवनाचे पैलू अधिक उजळविणारे आहेत असे दिसेल. आर्यधर्मातील राजा हा सत्तेने उन्मत्त नसतो तर तो संतश्रेष्ठांचे आशीर्वाद घेणारा व आपले शिर त्या चरणावर ठेवणारा असतो. म्हणून सारे राज्य आणि जीवनही त्यांना समर्पण करण्याची इच्छा झाल्याने बहुमोल रत्नांचा नजराणा शिवरायाने पाठविला, हे उल्लेखनीय आहे. तुकोबाही हे साधुश्रेष्ठ एवढे की, असा बहुगुणी राजा आपणाला शिष्य म्हणून लाभतो म्हणून ते हुरळले नाहीत. ‘इंद्रपदादिक भोग। भोग नव्हती ते भवरोग॥’ अशा सत्य जीवनधारणेमुळे आलेला नजराणा त्यांनी परत करून ‘राजा! प्रभूला स्मरून जनकल्याण करणे हेच आम्हाला आवडते, ते तू आम्हाला पुरवावे’ असा उलट निरोप पाठविला. या अभंगावरून संत तुकोबाराय राजाच्या समृध्द स्वराज्यसिध्दीसाठी चिंत्ता करीत होते हे निश्चित.

मात्र, हा नजराणा पाहून देवाला त्यांनी ऐकवले ते महत्त्वाचे आहे. धनराज्य, ऐश्वर्यसत्ता, लौकिक यांचा पाऊस पडला तरी न डगमगण्याचे धैर्य जिथे ते हृदय प्रभूला त्या निमित्ताने सांगते-

आता पंढरिराया। येथे मज गोविसी कासया॥

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥

तुमचे येर ते धन। ते मज मृत्तिकेसमान॥

तुकोबांचे शिवरायभेटीबद्दलचे आणखीही अभंग आहेत. पण दिलेले उतारे सूचक व परिपूर्ण आहेत.

दिवटया छत्रीचा उल्लेख, शिवरायांनी त्या पाठविल्या नसत्या तर एवढया तपशिलाने वर्णन होण्याची आवश्यकता काय? मुंगी आणि राव, सोने आणि मृत्तिका समान असून आम्हाला तुम्ही प्रभुचिंतन करण्याचे खरे सुख आहे ही भूमिका त्या भेटीखेरीज इतरत्र चपखल बसूच शकत नाही.

यावरून जे घडले ते साहजिक दिसते. तुकोबांची दिगंतकीर्ती ऐकून-वाऱ्याहाती गेलेल्या मापाने-भक्तिभाव व सत्पुरुषाबद्दल आदर असणारा हा धर्मवृत्तीचा बालराजा त्यांना नजराणा पाठविणे सहज शक्य आहे. याप्रमाणे तो धर्मरत बालराजा न पाठविता तर त्याच्या स्वभावप्रवृत्तिविरुध्द आक्षेप आला असता. फकीरांच्या कबरींना जो दान देतो तो सजीव, साक्षात्कारी आणि कीर्तनसिंधू वाहणाऱ्या व पुण्यापासून 16 मैलांवरील साधूला न भेटता विसरला असेल हे शक्यच नाही.

अर्थात शिवरायाची व तुकोबांची भेट होण्यावर दोघांचाही मोठेपणा अवलंबून नाही. दोघेही आपापल्या क्षेत्रात स्वयंभू, स्वप्रकाशी आहेत. मात्र स्वराज्य उदयकाली स्वराज्याची स्वप्ने साकार व्हावी म्हणून गगनपाताळ उचंबळविणारा हा दूरदृष्टी धर्मनिष्ठ राजा, सर्व आचारधर्माला लाजविणाऱ्या भक्तिमान व अखंड गर्जणाऱ्या कीर्तनश्रेष्ठाला ओळखू शकला नसेल, व महाराष्ट्राच्या भाग्यनौबती गर्जविणाऱ्या या बालाकरिता, देवाला तो संतश्रेष्ठ सादावीत नसेल हे शक्यच नाही. अधर्म व अंदाधुंदी वाढल्याने ‘पांडुरंगा तुम्ही निजलेत काय’ असा खडसावून सवाल विचारणारे, पांडुरंगच शिवरायाच्या रूपाने धर्माची पहाट घडवीत असल्याचे पाहून डोळे झाकून बसले असतील काय? तुकोबांची वचने सांगतात की, ते तसे गप्प बसले नव्हते. जो अल्पकाल या दोघात समान होता, त्या चारपाच वर्षांच्या अवधीत तुकोबांनी पाईक कसे असावेत, रणात कोण नीतीने वर्तावे याचे धडे घातले तेही जाणत्यांचे डोळे उघडण्यास पुरे आहेत. अर्थात निजलेल्यांना जागे करणे शक्य आहे. जागे असून झोपेचे सोंग घेणारांना नाही. त्या मोकळया आत्मप्रत्ययी जीवापुढे तुकोबांच्या पाईकावरील अभंगातील काही मार्मिक वचने ठेवीत आहे. ती वाचा, मनन करा. (येथे पाईक म्हणजे शिपाई हा अर्थ प्रथम ध्यानी घेणे अवश्य आहे.)

पाईकी वाचून नव्हे कधी सुख। प्रजामध्ये दु:ख न सरे पीडा॥

तरि व्हावे पाईक जीवाचे उदार। सकळ त्यांचा भार स्वामी वाहे॥

पाईकीचे सुख जया नाही ठावे। धि त्यांनी जियावे वायावीण॥

तुका म्हणे एका क्षणाचा करार। पाईक अपार सुख भोगी॥

शिपाई कर्तव्यतत्पर असले तरच प्रजेला सुख शक्य आहे. तो पाईक राजासाठी जिवावर उदार असावा लागतो. मग त्याचा धनी त्याचे सर्व काही बरे करतो. हे धन्याकरिता जीवन अर्पण करण्याचे सुख ज्यांना नाही ते फुका कशाला जगावे? म्हणजे तुकोबांना असे शिपाई देशरक्षक नाहीत ते सारे भूमीभार आहेत असे वाटतात. हा शिपाईपणा एका क्षणात जिवाचा करार करून भेटू शकतो. त्या एका क्षणाच्या निश्चयाने जे ध्येय अंगी जडते, त्यात अपार सुख असते.

पाईकीचे सुख पाईकासी ठावे। म्हणोनिया जीवे केली साटी॥

येता गोळया बाण साहिले भडिमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥

स्वामीपुढे व्हावे पडता भांडण। मग त्या मंडण शोभा दावी॥

पाईकांनी सुख भोगिले अपार। शूर आणि धीर अंतर्बाही॥

पाईक तो जाण पाइकाचा भाव। लगबग ठाव चोरवाट॥

आपण राखोनी ठकावे आणिक। घ्यावे सकळीक हिरोनिया॥

तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक। बळिया तो नाईक त्रैलोकीचा॥

पाईक असेल त्याला ते खरे ध्येयसुख माहीत, म्हणूनच जीवाभावापासून त्या जीवनाची साठवण (जोडी) केली. ते अंतर्बाह्य शूर आणि धीर असल्याने स्वामीपुढे होऊन गोळया आणि बाणांच्या वर्षावाला छाती पुढे करतात. असे शिपाई ज्याच्याजवळ तो कुठल्यातरी एखाद्या राज्याचा नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी-बळिया म्हणून शोभेल. म्हणजे असे शिपाई शिवरायाचे होते, असावे ही आकांक्षा, धर्मजीवनाने आधार पुरविणाऱ्या या साधुश्रेष्ठाची होती.

पाईकावरील अभंग ज्ञानराजादि इतर संतांचेही आहेत. पण त्यात शूरधीरत्वाचे व एकनिष्ठतेचे वर्णन प्रमुख आहे. तुकोबाराय "आपणा राखूनि ठकावे आणिक'' म्हणतात, चोराच्या वाटा माहीत असाव्या असे दाखवितात ते वैशिष्टय इतर पाईक अभंगात नाही. आणि याचे कारण उघड आहे. त्याकाळच्या परिस्थितीला तुकोबा जागे होते, त्या कालच्या राजाला अभिष्ट चिंतून देता येईल ते साह्य देण्याचे उत्कट प्रयत्न त्यात दिसून येतात.

‘रणी निघता शूर न पाहे माघारे’

‘एका बीजा केला नास। मग भोगिले कणीस।’

‘तुका म्हणे आधी करावा विचार। शूरपणे तीर मोकलावा॥’

‘मनाचा उदार रायाचा झुंजार। फिरंगीचा मार करीतसे॥’

‘शूरत्वावाचूनी शूरामाजी ठाव। नाही आविर्भाव आणिलीया॥’



अशी अनेक वचने तुकोबांच्या अंगीचे शौर्यचैतन्य राष्ट्रात फुलवीत होते, शिवप्रभूला साह्य देत होते. ईश्वरीलिखित एवढेच की, ही दोन श्रेष्ठांची संगती तुकोबांचा निर्याणकाळ येऊन चारपाच वर्षात संपली. ती अधिक काळ राहती तर?

पाईकीचे अभंग परमार्थवीर आणि राज्यचालक या दोघांनाही लागू पडणारे आहेत. पण ती अक्षरे ज्या परिस्थितीत उमटली तेथला वेष घेऊन आली आहेत असे वरील उदाहरणांनी स्पष्ट म्हणावेसे वाटते. नाथांनी भावार्थ रामायणात राक्षसांना दाढया असल्याचे वर्णन व्यर्थ केले नव्हते; तसेच तुकोबांचे पाईक दैवावर हवाला ठेऊन बसणारे नव्हते हे त्या अक्षरातून आपण ओळखू शकलो तर संत देश बुडवे होते, ते परिस्थितीपासून दूर राहणारे, पलायनवादी होते, इत्यादी आळशी व पोकळ डोक्यातील निंदेला वाव न देता कुठल्याही व्यक्तीचे मूल्यमापन त्या कालची परिस्थिती, व त्यांची कृत्ये व अक्षरे यांना धरूनच करू शकू.

पण शब्दशूर व जगाला धक्के देणारांना हे पटत नाही. ते आजचे संकेत, आजचे जीवन डोळयापुढे ठेऊन मागील काळातील लोकांचे मूल्यमापन करतात. तुकोबांच्या काळी यथा राजा तथा प्रजा हा राजधर्म होता, वर्णाश्रम हा समाजधर्म होता आणि वेदांतवाणी ही अध्यात्माची बाब हेती. तुकोबांनी आपले ध्येय, भक्तीने स्वत:चे व जगत्कल्याण साधण्याचे मानले. ते करताना हा देश सामाजिक दृष्टयाही पतित आहे हे जाणून उपदेशपर अभंगाने त्याला जागविला. प्रभूने अवतार घेऊन दुष्टाला दमन करावे ही आर्त वाणी ऐकविली.


एक ग्रंथ जो गागाभट्ट नी लिहिला होता...



 एक ग्रंथ जो गागाभट्ट नी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे 'समनयन'.
त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन आहे त्यात असं लिहिलं आहे,
'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात अश्या शंभू राजांच्या त्या पवित्र विचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.

संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षी पहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २० व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'.
भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं येतात आणी फुलं आल्या नंतर ते झाड मरत असतं.
याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान हवं ते सुद्धा भरपूर होतं.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.
'नखशिख'
'सातसतक'
आणि 'नाइकाभेद'.

नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे. आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा नाइकाभेद मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं ग्रंथ.

तिसरं ग्रंथ आहे नखशिख.
नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य शास्त्र काय आहे. का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट होऊ शकता याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आहे.
याचा अर्थ हा की संभाजी महाराज हे Doctor सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे.
आणखी काय उधारण द्यायचं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं?
संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मी त्या राज्याचा मालक नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.
वयाच्या ३० व्या वर्षी जेव्हा लोकांना मौज-मजा करण्याची हौस असते त्या वेळी अद्यात्म म्हणजे काय. संन्यास कसा घ्यावा. विर्स्त जीवन कसं जगावं याच्या वर संभाजी महाराजांनी सातसतक हा ग्रंथ लिहिला.
विषेश म्हणजे पहिला ग्रंथ बुद्धभूषन हा संस्क्रुत मधे आहे आणी बाकीचे ३ ग्रंथ हे भोजपुरी भाषेत आहे.
आणखी काय पुरावा द्यायचा माझ्या संभाजी महाराजांच्या गुणांचा?
सर्व गुण संपन्न जे म्हणतात ते आहे माझे संभाजी राजे....


अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,


अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,
परि त्यातून एक सर्वांतूनि आगळा राहिला,
स्वराज्याचा तो गद्दार पहिला,
नाव तयाचे खंडोजी खोपडा!

म्हणे काय वाचतो हा शिवराया,
मारिल यासे हा खान अफझुल्ला,
परि त्याचा अंदाज चुकला,
खान स्वतःच गर्दिस मिळाला!
खोपडा भय खाउन पळाला,

रोष शिवरायांचा ओढावला!
शरण अखेर येता जाहला,
कन्होजींकरवी शब्द लाविला! (कान्होजी जेधे)
(शिवरायांच्या) नजरेला नजर तो देता जाला,
क्षणात खोपडा पूरता भेदरला,

राजांचा तो हुकूम सुटला,
पाय डावा अन् हात उजवा (याचा) छाटावा!
राजे सखोंबीतसे जेध्यांना
"गद्दाराला माफी कैसी? उद्या ऐसे अनेक जन्मती,
स्वराज्यासी हि किड ऐसी, आम्हास ना खपणारी!
शब्द तुमचा म्हणून जिता सोडिला, नातरी छाटले असते मुंडक्याला!"

जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला!
याचे तो हृदयात अंगार फुलला!...
याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"

|| जय जिजाऊ ,जय शिवराय , जय महाराष्ट्र || 


वाघाच्या जबड्यात घालुनी हात.


 वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची


जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रुचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची



मिर्झाच्या राजकारणास,

 
मिर्झाच्या राजकारणास,
राजा झाला मवाळ,
दिली मान्यता तहास,
निघाला औरंग्याच्या भेटीस!
होता औरंग्याचा वाढदिवस,

जमला होता दरबारास,
म्हणती जयाला "दिवाण-ए-खास"
येथेच भेटला राजा औरंग्यास!
राजा उभारला मनसबेस...
परी पाहून पुढे जयसिंगास,
उसळला तो नरसिंहासमान,
बोले "हा तर उघड अपमान,
नको मजला हि मनसब!"

निघाला राजा तडक,
अर्धा सोडून तो दरबार,
सरदार जाहले स्तंभित,
म्हणती काय हि आगळिक!

औरंग्या राहिला स्वस्थचित्त
परि चित्ती करितसे विचार,
"खरेच हा आहे शूर,
उगा ना पळाला मामा शाइस्त!"

औरंगजेब बोलला खुदासी,
"शुक्र है अल्लाचा, दुश्मन दिया तोभी शिवा जैसा!
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात,
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात ||


गरुडाचे पोर ते...


गरुडाचे पोर ते...
गरुडच व्हणार ते...
रयतेच भलं ज्यात...
तेच करणार ते...
भवानीच अभय त्यासी...
कुणा नाही भ्यायचं...
गुणी मोठं,थोर व्हतं,लेकरू त्या आईच...!!
अंगी बळ,अन पाठबळ,महादेवाच्या पायाच....!

जय जिजाऊमासाहेब.....
जय जय शिवराय..


चौका-चौकात पावनखिंड गल्ली-गल्लीत खजिने..


चौका-चौकात पावनखिंड गल्ली-गल्लीत खजिने..
घराघरातील लुट थांबविण्या एक तरी बाजी हवा..
ओटी प्रत्येक मातेच्या एक तरी शिवबा हवा..





रावणाचा संहार करणारा तो कौशल्येचा राम होता,

रावणाचा संहार करणारा तो कौशल्येचा राम होता,
सुर्याला निगळणारा तो अंजनीपुञ हनुमान होता,
द्रौपदीला जिंकणारा तो कुंतीपुञ अर्जुन होता,
असाच मराठ्यांचा तळपता दिवा तो जिजाऊमासाहेबांचा 'शिवबा' होता..!

॥जय जिजाऊ ॥
॥जय शिवराय॥



फ़ोडुनी कोथळा छातीचा,

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

समशेरीशी खेळ्लोय मी,
हातात भाले पाळण्यातही....
संकटांचे पहाडही मोठे,
तोडलेय मी खेळण्यातही....

दुरुनही चटका देणारा,
ताप मी जळत्या वातीचा......
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

निधडी छाती ताव मिशीवर,
फ़ेटा रुळला खांद्यावरती.....
जिथे जोडले गद्दार होते,
वार मी केले सांध्यावरती....

बाजी,दाजी,मुरारबाजी,
तान्हा,जीवा अन संताजी......
रक्त पेरले ज्या मातीवर,
त्या मातीशी नाळ माझी....

दंशण्यास शत्रुस तत्पर,
सर्प मी विलगत्या कातीचा....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

शिवसंपत्ती म्हणौन आजवर,
जपला महाराष्ट्र मीच आहे...
नजर ठेवुनी चोरण्यास हा,
शत्रुच माझा नीच आहे...

दंड ठोकुनी वेशीवरती,
रक्षिणार मी राष्ट्र सारा....
जातीपाती नाहीत जेथे,
फ़क्त प्रीतीचा असे पसारा...

जगात झेंडा उंच ज्याचा,
तोच मी मराठा ख्यातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....


विसरलाय स्वाभिमान प्रत्येक मराठा.


विसरलाय स्वाभिमान प्रत्येक मराठा
विसरलाय स्वताचीच अस्मिता
त्याच्या डोळ्यात थोड अंजन घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा

तलवारीसुधा झाल्यात गवताची पाती
विसरलोय आम्ही आपापसातील नाती
विस्कटलेली घरटी एकत्र करून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा

गडकिल्ले झालेत पर्यटन स्थळे
राजकीय नेत्यांची विश्रांती स्थळे
याच गडकोटाना हक्काची गडवाट देवून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा

चुरगालीयेत पाने इतिहासाची
राजे तुमच्या प्रत्येक पराक्रमाची
इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्तीत कव्हर घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा

उशिरा का होईना
एकदा तरी येवून जा
नाहीच जमलं राजे तुम्हाला यायला तर
या सह्याद्रीला पुन्हा एकदा छावा देवून जा


राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ||



मुरुड जंजिरा वरील आक्रमण


 ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.

जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.

त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.

याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.

संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.

दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.

पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.”

मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.

पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू.





छत्रपति म्हणजे



छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात
बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात
मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ
जय शिवराय
जय शभुं राजे.



ठेवूनिया सल काळजात,

 
ठेवूनिया सल काळजात,
शंभुराजाच्या वीर मरणाची.!
जगण्या आदर्श जीवन,
घेवू स्फूर्ती त्यांच्या शूर जगण्याची,
वंदुनी तयाचे चरण,
पुन्हा पेटवू मशाल स्वराज्याची..
त्यांच्या अंखड पराकमाला पुन्हा एकदाञिवार
वंदन.!
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर
गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल
द्वादशी) त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार
मुजरा आणि अभिवादन ...
जय शंभूराजे.



पराक्रमाला पंख नवे......!


 भगव्या साम्राज्याचे धगधगते निखारे आणि ज्वलंत निर्भिड युग्योद्धे
राजे छत्रपति संभाजीराजे भोसले यांची आज जयंती....
-----------प्रासंगिक-----------------------

करोडो इतिहासाच्या पानांचा भव्य दिव्य मुजरा...............
एक लखलखता झंजावात.....जय....राजे.......

छत्रपति संभाजीराजे भोसले -

छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा। येसूबाई दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महातेजस्वी भास्कर, ज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्यु सुद्धा हळहळला असेल, प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतील, आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा, संभाजी राजा !

केवळ सव्वा दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सकल सौभाग्यसंपन्न सईबाई राणीसाहेब यांना देवाज्ञा झाली। थोरल्या छत्रपतिंचा भावगड आणि शंभुबाळावरचे मायेचे छत्र देवाने हिरावुन घेतले। बालपणीच आईविना पोरक्या बाळाची जबाबदारी घ्यायला शिवरायांच्या इतर राण्यांपैकी कुणीच पुढे सरसावले नाही, मग मात्र जिजाउंनी त्यांना आपल्या मायेखाली घेतले, त्यांच्या जागरुक नजरेखाली बाळराजांचे व्यक्तिमत्व घडत गेले. सोयराबाईंना पुत्रप्राप्ती होई पर्यंत त्याही शंभुराजांवर अतोनात प्रेम करत असतं. पण, राजारामचा जन्म झाला, आणि कालांतरानी छत्रपतिंनी शंभुराजांना युवराज्याभिषेक केला. संभाजीराजांच्या जन्मापासुन त्यांना अभिषेक झाला तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमजच पसरत गेले.

त्यांना अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे, संस्कृत, संगीत, धनुर्विद्या य विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. ते राजपुत्र असुन स्वभावत: च अत्यंत शुर असल्यामुळे त्यांना बालपणापासुन युद्धकलेचे शिक्षण मिळाले.

शिवरायांचा राज्याभिषेक होईपर्यंत शंभुराजांचे आयुष्य अत्यंत सुरळीत होते. त्यांना युवराजपद मिळाल्यापासून भोसले घराण्यात गृहकलह सुरु झाला आणि शंभुराजांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली; त्यांच्या जीवनात जो झंझावात सुरु झाला त्याचा शेवट, त्यांच्या दुदैवी अंतानेच झाला.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्तुत्वाबरोबरच भाग्याचीही जोड लागते. शिवरायांच्या अंगी जसे अलौकिक कर्तुत्व आणि दूरदृष्टी होती, तसेच दैवही त्यांचा सतत त्यांच्या सोबत असे. त्यांनी अफज़लखानाची घेतलेली भेट तसेच आग्रा येथिल जीवावरचे संकट यांच्या अभ्यास केल्यावर एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे, शिवरायांना जर दैवाची साथ नसती तर?? महाराजांचे शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, योजकता, कल्पकता अचाट होती पण त्यांच्या जोडीला दैवानेही हात दिला नसता तर या प्रसंगात काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
शंभुराजांचे जीवन याच्या अगदी उलट होते. ते शुर, धैर्यवान, धाडसी, साहसी, योजक, निपुण होते, पण त्यांचे एकुण आयुष्य पाहता असे वाटते की नियती त्यांच्या कपाळावर यशाचा कस्तुरी कुंकुमतिलक लावयला विसरली होती की काय?

युवराज्याभिषेक झालानंतर सैन्याच्या तुकडीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणुन शिवरायांनी शंभुराजांच्या हाताखाली ५ ते १० हजार सैन्य देऊन रामनगर, जव्हार ई. राज्यांवर चढाई करण्यास पाठवले होते. त्याचबरोबर दिवाणी कामकाजामध्येही शंभुराजे सहभाग घेत असत. युवराज्याभिषेकानंतर शिवरायांच्या अनुपस्थितित त्यांनी स्वत:च्या सहीशिक्याने त्यांनी अनेक निवाडे केले आहेत, तंटे सोडविले आहेत.

महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत गादीच्या वारसाहक्काचा प्रश्न उपस्थितच झाला नव्हता, त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे जिजाबाईसाहेब, पण राज्याभिषेकानंतर फक्त १३ दिवसांनी सर्वांवर आपल्या अस्तित्वाने, व्यक्तिमत्वाने, अधिकाराने वचक ठेवणारी राजमाता १७ जुन १६७४ रोजी निधन पावली. त्यानंतरच वारसाहक्काच्या प्रश्न ऐरणीवर आला, आणि त्याला कारण म्हणजे सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला असला तरी युवराजपद मात्र राजारामाकडे न जाता संभाजीराजांकडे आले; त्याचबरोबर त्यांचा वारसाहक्क मान्य झाला. त्यांची राजमाता बनण्याची स्वप्ने जरी खरी होणार असली तरी गादीवर येणारा राजा हा त्यांचा पुत्र नसणार होता हे एकच कारण सोयराबाईना शंभुराजांचा द्वेष करायला पुरेसे होते.






पहाडाची छाती अन...चंद्राची शितलता.....राजे


पहाडाची छाती अन...चंद्राची शितलता.....राजे
छत्रपती संभाजी...!
महाराष्ट्राच्या इतिहासाचे...दिपस्तंभ...!!
"असेल काय सामर्थ्य ईतूके कोणा ठायी...!
ज्यांच्या पराक्रमाने चंदन झिजते पायी...!!"
छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व,
शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई
आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा। येसूबाई
दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महातेजस्वी भास्कर,
ज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्यु सुद्धा हळहळला असेल,
प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतील,
आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान
देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य
करणारा राजा, संभाजी राजा !
केवळ सव्वा दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सकल
सौभाग्यसंपन्न सईबाई राणीसाहेब यांना देवाज्ञा झाली।
थोरल्या छत्रपतिंचा भावगड आणि शंभुबाळावरचे मायेचे छत्र
देवाने हिरावुन घेतले। बालपणीच
आईविना पोरक्या बाळाची जबाबदारी घ्यायला शिवरायांच्या इतर
राण्यांपैकी कुणीच पुढे सरसावले नाही, मग मात्र
जिजाउंनी त्यांना आपल्या मायेखाली घेतले, त्यांच्या जागरुक
नजरेखाली बाळराजांचे व्यक्तिमत्व घडत गेले.
सोयराबाईंना पुत्रप्राप्ती होई पर्यंत त्याही शंभुराजांवर
अतोनात प्रेम करत असतं. पण, राजारामचा जन्म झाला,
आणि कालांतरानी छत्रपतिंनी शंभुराजांना युवराज्याभिषेक केला.
संभाजीराजांच्या जन्मापासुन त्यांना अभिषेक
झाला तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर
इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमजच पसरत गेले.
त्यांना अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे
मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे,
संस्कृत, संगीत, धनुर्विद्या य विषयांचा त्यांनी सखोल
अभ्यास केला. ते राजपुत्र असुन स्वभावत: च अत्यंत शुर
असल्यामुळे त्यांना बालपणापासुन युद्धकलेचे शिक्षण मिळाले.



|| हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे ||


कैलासाच्या माथी जरी शिव शंकर विराजले,
बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले,
टाप मारताच येथे उधळली तलवारीची पाती,
येथेच जुळली माझ्या मराठा मनाची नाती...!!!

स्वराज्याचा पुरावा देत आहे माजा एक एक कडा,
येथेच सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद आहे आजुन ताजी,
गनिमाच्या उरावर नाचले माझे तानाजी अन बाजी...!!!

ह्रदयात माज्या खलखलतात कोयना आणि कृष्णा,
मराठा मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा,
कसा सांगू लेका उर माजा फुटत आहे,
रायगड आणि प्रतापगडी मी तीळ तीळ तुटत आहे...!!!

आफजल्याचा वाढता बुरुंज काळीज माज तोडू पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे...!!...!!

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराय॥