श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
श्रवण मननाचा विचार | निजध्यासे साक्षात्कार | रोकडा मोक्षाचा उधार | बोलोची नये ||१७-३-३ ||
जे श्रवण केले ते मनन करून विचार वाढवावा .त्यानंतर जे मिळवायचे आहे [माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय परब्रह्माची प्राप्ती ] त्याचा निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा .ह्याची देही ह्याची डोळा ,ह्याची जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यावी .आत्मसाक्षात्काराने रोकडी प्रचीती घ्यावी असे समर्थ सांगतात .पुढील जन्मात मोक्षप्राप्ती करून घेउ अशी उधाराची भाषा बोलू नये असे समर्थांचे सांगणे आहे ,कारण पुढचा जन्म कोणता मिळेल ते सांगता येत नाही.

