Wednesday, May 16, 2012
संत संगतीने नरदेहाचे सार्थक करावे
संत संगतीने नरदेहाचे सार्थक करावे
या नरदेहाचेनी लागवेगे | एक लागले भक्तिसंगे |
येकी परम वीतरागे | गीरीकांदरे सेविली ||
या नरदेहाचेनी आधारे | नाना साधानांचेनी द्वारे |
मुख्य सारासारविचारे | बहुत सुटले ||
या नरदेहाचेनी समंध्ये | बहुत पावले उत्तम पडे |
अहंता सांडून स्वानंदे | सुखी झाले ||
पशुदेही नाही गती | ऐसे सर्वत्र बोलती |
म्हणौन नरदेहीच प्राप्ती | परलोकाची ||
तत्वज्ञानाची योगाभ्यासी | ब्रम्हचारी दिगंबर संन्यासी |
शडदर्शनी तापसी | नरदेहीच जाले ||
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ | नाना देहांमध्ये वरिष्ठ |
जयाचेनि चुके आरिष्ठ | येमयातनेचे ||
संत आनंदाचे स्थळ | संत सुख ची केवळ |
नाना संतोषांचे मूळ | ते हे संत ||
३५. सारंगपुरच्या मारुतीची कथा
जांबेहून समर्थ सारंगपूर येथे आले. हे ठिकाण आंध्र प्रदेशात निजामाबाद्पासून सुमारे १५ मैलांवर आहे.
त्या वर्षी आंध्र प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला होता.
सर्वसामान्य प्रजा घोटभर पाण्यासाठी वणवण हिंडत होती.
समर्थांनी सरांग्पुरला पाहिलं, की एका सरोवरात ६० ब्राम्हण उभे राहून काही तरी अनुष्ठान करत होते.
समर्थांच्या बरोबर त्यांचा लाडका शिष्य उद्धव होता.
समर्थांच्या सांगण्यावरून उद्धवने त्या ब्राम्हणांची भेट घेतली आणि अनुष्ठानाचे प्रयोजन विचारले.
सारंगपुरच्या यवन अधिकाऱ्याने दुष्काळासाठी या साठ्ही ब्राम्हणांना वेठीला धरले होते.
त्या ब्राम्हणांना पाऊस पडेपर्यंत घरी जाता येणार नव्हत.
पाऊस पडावा म्हणून त्यांना सक्तीने अनुष्ठानाला लावले होते.
हे सर्व प्रकरण कळल्यावर समर्थांनी त्या सरोवराशेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली.
त्या मूर्तीवर भगवे वस्त्र ठेवले आणि ब्राम्हणांना सांगितले कि, तुम्ही जर या हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला तर नक्की पाऊस पडेल. ब्राम्हणांना मोठी आशा वाटली.
समर्थाचे तेज पाहून त्यांनी मोठ्या श्रद्धेने हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला.
त्यासरशी धो-धो पूस सुरु झाला.
ब्राम्हण आनंदले.
त्यांची सुटका झाली.
ही वार्ता कळताच निजामाबाद्च्या सुलतानाने समर्थांना सन्मानपूर्वक निजामबादला नेले.
त्यांना मठासाठी ५० एकर जमीन दान दिली.
तिथे समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली.
याच उद्धवांनी निजामबादहून समर्थांना पत्र लिहिले.
त्यात प्रार्थना केली -
"मला वाटते अंतरी त्वां वसावे |
तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे |
अपत्यापरी पाजवी प्रेमरसा |
महाराज्या सद्गुरू रामदासा ||'
देव पाहता निराकार
- देव पाहता निराकार । आपला तो माईक विचार । सोहं आत्मा हा निर्धार । बाणोंन गेला । । ९ -१०-१४ । ।
देव निर्गुण निराकार आहे .मीपणा खरा नाही .अशा विचाराने मी तोच आहे ,मी आत्मा आहे हा निर्धार अंगी बाणतो.मी आत्मा आहे असा साक्षात्कार होतो .तो सिध्द बनतो .त्याला साधनाचे बंधन नसते .तो आत्मस्वरूप झाल्यावर त्याला साधनाचे बंधन नसते .त्याची साधकावस्था संपते .मग तो स्वस्वरूपाचा मायेचा शोध घेतो .आपली अहंता ,माया खोटी आणि परमात्मा खरा असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो . साधनाने आपल्याला काय साधायाचे आहे हे ध्येय निश्चित ठरवावे लागते .देहाचा विचार केला तर देह पंचमहाभूतांचा असतो व जीवाचा विचार केला तर जीव असतो ब्रह्माचा अंश !विचाराने तत्वांचा निरास करता येतो व फक्त निर्भेळ आत्मस्वरूप अनुभवास येते .
ज्ञाता वेगळेपणाने ज्ञेयाचे ज्ञान करून घेतो तोपर्यंत ते ज्ञान वृत्तीरूप असते ,कारण त्या ज्ञेयाची प्रतिमा ज्ञात्याच्या मनात तयार होते .त्या प्रतिमेत कल्पना असते ,पूर्वानुभव असतो ,भावनेचा ओलावा असतो ,बुध्दीचा अंश
असतो .ही स्थल कालाच्या मर्यादेत असते .अशा अनेक प्रतिमा तयार होतात .त्यांना वृत्ती म्हणतात .आपल्या मी मध्ये अशा अनेक वृत्तींचा समूह असतो .मी लयाला गेला की वृत्ती लयाला जातात . देह्बुध्दीचे ज्ञान वृत्तीरूपात असते .त्या वृत्ती कल्पनेने भरलेल्या असतात .कल्पनेने जे दृश्य निर्माण होते ते खोटे असते .ते खोटे ठरले ,दृश्य लय पावले की शुध्द निर्गुण स्वस्वरूप उरते .विवेकाने ते स्वस्वरूप म्हणजे आपण स्वत : आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो .हीच परमार्थाची खूण आहे .
Subscribe to:
Comments (Atom)




