Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Wednesday, March 25, 2015

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥





॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥


॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ 
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ । 
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे 
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम 
॥ समास पहिला ॥ १ ॥

मराठा तितुका मेळवावा




“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”
“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”
रामदास स्वामी शिवकाळात महाराष्ट्राला मिळालेले थोर संत, वर्तमानचा व भविष्याचा वेध घेवुन


आपले मत परखडपणे मांडणारे संत,इतर संत हे फ़क्त भक्ती व आहिसक मार्गवरुन चालणारे होते
पंरतु रामदासांनी परिस्थिती प्रमाणे कसे वागावे हे शिकवले,


मना सज्जना तु कडेनेच जावे।
न होऊन कोणास दुख:वावे॥
कुणी दृष्ट अंगास लाविल हात।
तया दाखवावा भुजंगप्रयात॥
या श्लोकावरुन रामदासाचे विचार दिसुन येतात आपण कोणाच्याही वाटेला जाऊ नये,परंतु जर एखादा
दृष्ट अंगावर आला तर आपण शांत न बसता त्याला योग्य उत्तर हे दिलेच पाहीजे.
त्याच बरोबर वाईट प्रसंगी डोके शांत ठेउन पुढील पावले उचलली पाहिजेत ही शिकवण समर्थानी दिली.
रामदासानी संभाजी पाठवलेले उपदेशपर पत्रामध्ये रामदास स्वामी सांगतात,


अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।
तजविण करीत बसावें। एकांत स्थळी॥१॥
कांहीं उग्र स्थिति सोडावी। कांहीं सॊम्यता धरावी।
चिंता पराची लगावी। अंतर्यामी॥२॥
रामदास स्वामींचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी असलेल्या जांब या गावी झाला.
त्याचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला.रामदासाचे मुळ नाव हे नारायण होते, परंतु ते स्व:ताला रामाचे दास समजत
म्हणुन त्यांना लोक रामदास स्वामी म्हणु लागले.त्यांनी दासबोध या ग्रंथाची निर्मीती केली.
तसेच मनाचे श्लोकातुन सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली.बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदीरे बांधली.
लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले.’सामर्थ आहे चळवळीचे, जो करील तयाचे’हा संदेश त्यांनी दिला.
अन्यायाविरुदध प्रतिकार करण्यांची स्फ़ुर्ती त्यांनी दिली.


त्याकाळी शिवाजींनी लोकांच्या हातात तरवार देऊन लढायला तयार केले तर रामदासस्वामीनी वॆचारिकपणे
त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली.शिवाजी महाराजांसारखा पुरुष पहिल्यावर तळमळ
वाटुन ते तुळजाभवानीची प्रार्थना करतात की,’तुझा तु वाढवी राजा, शीघ्र आम्हीही देखता.
पुढे शिवाजींनी मुस्लिमाचा पराभव करुन स्वराज्याची स्थापना केली.तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु येऊन उदगार काढले
,’बुडला ऒरंग्या पाणी, मत्तसंहार जाहला, मोडिली मोडिली छत्रे आनंदभुवनी’.
महाराष्ट्र धर्म प्रसारासाठी त्यांनी महान कार्य केले.त्याच्या या धर्माचे सार हे,”मुख्य ते हरीकथानिरुपण,
दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी”.धर्मप्रसारसाठी त्यांनी ११०० मठांची स्थापना करुन
आपल्या शिष्यांची योजना केली.
रामदास स्वामींनी ही राजकारणावर लक्ष दिले. शिवाजी महाराजाची व रामदास स्वामीची भेट झाली का नाही
यावर वाद आसला तरी दोघाचे उदिष्ट हे एकच होते.रामदासानी संभाजी पाठवलेले पत्र प्रसिद्ध आहे
त्यात रामदास स्वामी अस्वस्थ संभाजी आपल्या पित्याची आठवण करुन देताना म्हणतात,



“शिवराजांचें आठवावे रुप। शिवाराजाचा आठवावा साक्षेप।
शिवरायाचा आठवावा प्रताप। या भुमंडळी॥१८॥
शिवरायांचे कॆसें बोलणें। शिवरायांचे कॆसें चालणे।
शिवरायाचे सलगी देणें। कॆसी असे॥१९॥
सकळ सुखाचा केला त्याग। करुनी साधिजे योग।
राज्य साधनेची लगबग। कॆसी केली॥२०॥
त्याहु्नि करावें विशेष। तरी च म्हणवावें पुरुष।
या उपरी आतां विशेष। काय लिहावें॥२१॥
अशाप्रकारे रामदास स्वामी स्वराज्याच्या छ्त्रपतीला डिवचतात की तुमच्या पित्यानी किती कष्टांनी स्वराज्य स्थापन केले,
त्यांची आठवण ठेऊन आपण त्यांच्या पेक्षाही अधिक पराक्रम गाजवावा तरच आपण पुरुष म्हणुन घ्यावे.
शेवटच्या श्लोकात ते म्हणतात की, तुम्ही समजदार आहात तुम्हाला अधिक काय सांगावे.तुम्ही योग्य तो निर्णय़ घ्यावा.



अशाप्रकारे समर्थ रामदास स्वामी यांच्या उपदेशांची जोड लाभल्यामुळे स्वराज्य स्थापनेची तीव्र आकांक्षा व
ती सिध्दीस नेण्यात लागणारे लष्करी सामर्थ्य ही दोन्ही एकाच वेळी महाराष्ट्रात तयार झाली
त्याच वेळी तिचा उपयोग करुन घेणारा शिवाजीराजांसारखा पुढारीही महाराष्ट्रात निर्माण झाला.
त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.आजच्या युगात समर्थाचे मनाचे श्लोक पाठ करुन ते आचरणात आणले
तरी खुप मोठा बद्ल घडल्याशिवाय राहणार नाही.

संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग

हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा
रामदासी बाणा या रंगाचा ।
पीतवर्ण कांती तेज अघटित
आवाळू शोभत भृकुटी माजी ॥ १ ॥

काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात
स्मरणी हातात तुळशीची ।
रामनाम मुद्रा द्वादश हे केले
पुच्छ कळवळी कटी माजी ॥ २ ॥

कौपिन परिधान मेखला खांद्यावरी
तुंबा कुबडी करी समर्थाच्या ।
कृष्णातटा काठी जाहले दर्शन
वंदिले चरण तुका म्हणे ॥ ३ ॥


संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यावर समर्थांच्या दर्शनाची शिवछत्रपतींना ओढ लागली होतीच.
ते चाफळ जाऊन समर्थांना भेटणार होतेच. पण योगायोगाने त्यांचा मुक्काम वाईला होता. वाईमधील
समर्थशिष्यांकडून ही बातमी चाफळला पोचली. मघाशी वर्णन केल्याप्रमाणे समर्थांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवले
व शिवसमर्थ भेट झाली. या चरित्रात संत तुकाराम महाराजांचा उल्लेख समर्थांच्या एवढा येत नाही.
याचे कारण संत तुकाराम महाराज फार लवकर सदेह वैकुंठाला गेले. त्या वेळी शाहिस्तेखानाचा पराभव
या महत्वाच्या घटना तुकाराम महाराजान्नाच्या निर्याणानंतर ९-१० वर्षांनी घडल्या. याउलट समर्थ शिवाजी महाराजांच्या
निर्याणानंतर पावणेदोन वर्षांनी समाधिस्त झाले. त्यामुळे संपूर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले.
१६५७ साली प्रतापगडावर छत्रपतींनी तुळजाभवानीची स्थापना केली तेव्हा समर्थांनी या देवीला साकडे घातले –

“ दुष्ट संव्हारिले मागे । ऐसे उदंड ऐकितो ।
परंतु रोकडे काही । मूळ सामर्थ्य दाखवी ॥
तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाचि देखता ।
मागणे एकची आता । द्यावे ते मज कारणे ॥
रामदास म्हणे माझे । सर्व सातुर बोलणे ।
क्षमावे तुळ्जे माते । इच्छा पूर्णचि तू करी ॥ ” 

शिवाजी महाराजांच्या हातात सत्ता यावी व त्यांच्या मस्तकावर हिंदवी स्वराज्याचे छत्र झळकावे याची समर्थांना
किती ओढ लागली होती ते या प्रार्थनेत दिसून येते.
पुण्याच्या समर्थ व्यासपीठाच्या एका समारंभात प. पू. बाबा महाराजसातारकर म्हणाले,
तुकाराम आणि समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते ही गोष्ट कधी नाकारता येणार नाही. ”


जय जय रघुवीर समर्थ !!!

श्री तुकाराम महाराज



जन्मांचे ते मुळ पाहिले शोधुन । दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥

पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी । नरदेहा येवुनी हानी केली ॥

रजतमसत्व आहे ज्यांचे अंगी । याच गुणें जगी वाया गेला ॥

तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥

तुका म्हणे ऎका सत्याचे सामर्थ्य । करवी परमार्थ अहर्निशीं ॥