Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Thursday, May 17, 2012

समर्थ रामदासांचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र :





 
निश्र्चयाचा महामेरू । बहुतजनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। १ ।।

परोपकाचीया राशी । उदंड घडती जयाशी ।
जायचे गुणमहात्त्वाशी । तुलना कैशी ।। २ ।।

नरपती हयपती गजपती। गडपती भूपती जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी ।। ३ ।।

यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नितीवंत । जाणता राजा ।। ४ ।।

आचरशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील। सर्वा ठायी ।। ५ ।।

धीर उदार सुंदर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले।। ६ ।।

तीर्थ क्षेत्रे वत मोडिली । ब्रम्हस्थाने बिघडली ।
सकल पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।। ७ ।।

देवधर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।। ८ ।।

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याद्निक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायी ।। ९ ।।

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ।। १० ।।

आणखी काही धर्म चालती । श्रीमंत होऊनि कित्येक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विस्तारली ।। ११ ।।

कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला । शिवकल्याण राजा ।। १२ ।।



No comments:

Post a Comment