शिवथरघळीत
समर्थ सुमारे ८ वर्षे राहिले.
त्या काळात घळीच्या अवतीभवती घनदाट जंगल होते.
घळीमध्ये वाघ-सिंह अंडी हिंस्त्र स्वपाडांचा वावर होता.
साप, नाग, अजगरदेखील भरपूर असत.
अशा परिस्थितीत हा निसर्गप्रेमी संत घळीचे सुंदर वर्णन करतो.
गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे ||
गर्जतो मेघ तो सिंधू | ध्वनी कल्होळ उठिला |
कड्याशी आदळे धारा | वाट आवर्त होतसे ||
आपण यापूर्वीच पहिले कि, भारत भ्रम्नानंतर समर्थ जम्बेत जाऊन आईला भेटले होते.
त्यावेळी आईने इच्चा व्यक्त केली होती कि,
माझ्या अंतकाळी तू मला भेटायला ये.
त्यानुसार समर्थांनी आईला शब्द दिला होता.
भक्ताने दिलेल्या शब्दांची जबाबदारी भगवंत आपल्या शिरावर घेत असतो.
समर्थ शिवथर घळीत दासबोध लेखन करत असताना त्यांच्या स्वप्नात अन्ग्लाइदेवि आली आणि म्हणाली - " तुझी आई जांब गावी खूप आजारी आहे.
एकदा तिला जाऊन भेट'.
त्यानुसार समर्थ जांब गावात आले. त्यांनी प्रथम हनुमंताचे दर्शन घेतले आणि ते घरी आले.
राणूबाईंना झालेला आनंद कोणत्या शब्दात वर्णन करावा ! समर्थांनी सात दिवस आपल्या आईला अंतकाळी उपयोगी पडेल असा उपदेश केला.
राणू बाईंचे मन संसारातून निघून गेले.
त्यांनी आपले डोके समर्थांच्या मांडीवर ठेवले.
भगवंताचे चिंतन करीत असतानाच त्यांनी या जगाचा आनंदाने निरोप घेतला.
समर्थांच्या कृपेने त्यांचा शेवटचा दिस गोड झाला.
समर्थांनी मातेच्या मुखात गंगाजल आणि तुलसीदल घातले. जणू पुत्राने मातेला मोक्ष दिला.

No comments:
Post a Comment