पदी राघवाचे सदा
ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥
अर्थ : - श्रीरामांच्या पायात तोडर आहेत त्यांचा रुमझुम असा सुंदर ,मधुर आवाज येतो .तो आवाज सांगतो की हे मना ,तू माझा भक्त आहेस ना ?घाबरू नकोस .मी तुझ्या पाठीशी आहे . हा आवाज म्हणजे श्रीरामांचे ब्रीद आहे .ब्रीद दोन प्रकाराचे आहे .एक आहे भक्तरक्षणाचे -दुष्टांचे पासून भक्तांचे रक्षण करणे .दुसरे हा भवसागर भक्तांना पार करून देणे .संसार सागरातील सर्व आशा ,मोह ,ममता यांच्या बेड्या तोडून टाकणे ,संसार बंधनातून भक्ताची सुटका करून ,मोक्ष प्राप्ती करून देणे . अशा दोन्ही प्रकारे भक्त रक्षणाचे ब्रीद असलेल्या श्रीरामांच्या खांद्यावर असणारे धनुष्य असे आहे की त्याचा टणत्कार ऐकून त्यांचे शत्रू थरथर कापत .श्रीरामांना शरण गेलेल्या प्रत्येक भक्ताचे रक्षण श्रीरामांनी केले .भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने दिलेल्या त्रासातून सहीसलामत सुटका केली .त्याच्या साठी नृसिंह अवतार धारण केला .ध्रुवाला अढळपद दिले . असे एकवचनी ,एकबाणी ,गुणवान ,शीलवान असणारे ,बलाढ्य असणा-या श्रीरामांनी रामराज्य केले .त्यांनी अयोध्यानागारी आनंदमय ,प्रेममय केली .एव्हडेच नाही तर सर्व अयोध्या नगरीचा उध्दार केला .म्हणून समर्थ म्हणतात :पुरी वाहिली सर्व जेणे विमानी

No comments:
Post a Comment