Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Sunday, May 13, 2012

ग्रंथा नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद ||




समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते.
त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या.
आजही चाफळ, शिथार्घाल, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात.
काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या.
एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची.
त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली.
श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले.
सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही साक्ष देत आहे.
सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार कार्याची होती.
या बागेत कोणकोणती झाडे लाव आयची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे.
यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते.
बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फुल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे.
सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले.
तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे.
दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते कि, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला?
जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.


No comments:

Post a Comment