समर्थ चाफळला मठामध्ये कर्मठपणा अथवा फाजील सोवळे-ओवळे मानीत नसत.
ते प्रत्येक पुरुषामध्ये रामचंद्र आणि प्रत्येक स्त्रीमध्ये जानकी पाहत असत. त्या काळातील काही सनातनवादी ब्राम्हणांना समर्थांची हि व्यापकता मानवली नाही.
भेटो कोणी येक नर |
धेड महार चांभार |
त्याचे राखावे अंतर |
या नाव भजन ||
हि समर्थांची भजनाची व्याख्या या ब्राम्हवृन्दास मान्य नव्हती.
म्हणून एका रामनवमी उत्सवात ब्राम्हणांनी जेवणाच्या पंक्तीवर बहिष्कार टाकला.
समर्थांचे विचार मोठे क्रांतिकारक होते.
या घटनेने ते डगमगलेले नाहीत.
उलट त्यांनी कल्याण स्वामींना सांगितले कि,
भोवरवाडी येथील १००० दाम्पत्य भोजनास सांगावे.
चाफळ जवळील भोवर वाडी येथे पूर्ण हरिजन वरती होती.
समर्थांनी १००० हरिजन दाम्पत्यांना भोजनासाठी आमंत्रण दिले.
चाफळला येताच सर्वांनी मांडू नदीत स्नान केले.
या हरिजन दाम्पत्यांचे पूजन करताना समर्थांनी सर्व स्त्रियांना साडी-चोळी दिली तर सर्व पुरुषांना धोतर- उपरणे दिले.
त्या सर्वांना समर्थांनी अत्यंत प्रेमाने जेवायला वाढले.
समर्थांच्या मनात अवघ्या मानव जातीबद्दल समत्वाची आणि प्रेमाची भावना होती.
म्हणून ते श्रीमद दासबोधात म्हणतात -
ब्राम्हणाचे ब्रम्ह ते सोवळे |
आणि शूद्राचे ब्रम्ह ते ओवळे |
ऐसे आगळे वेगळे |
तेथे असेचिना ||
उंच ब्रम्ह रायासी |
आणि नीच ब्रम्ह परीवारासी |
ऐसा भेद तयापासी | मुळीच नाही ||

No comments:
Post a Comment